मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक; पोलिस यंत्रणा अलर्ट वर


मुंबई:- सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले आहेत. मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. त्यामुळे मुदत संपत असताना मराठी पाट्या लावणार नाहीत, तेथे खळखट्ट्याक करण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आल्याने पोलिस यंत्रणादेखील ‘अलर्ट मोड’मध्ये आली आहे.

राज्यात मराठा, धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजाचेदेखील राज्यात ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहे. सोशल मीडियावर शाब्दीक चकमकी घडत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यासंदर्भात दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. तीन दिवस शिल्लक राहिल्याने मनसेकडून तारीख संपत असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहे.

Advertisement

याचा अर्थ त्यानंतर मनसेकडून आंदोलन केले जाणार आहे. यातून मनसेची खळखट्याक स्टाइलदेखील समोर येवू शकते. आरक्षणासाठी मराठा व धनगर समाजाचे आंदोलन, ओबीसी समाजाचे मेळावे या पार्श्‍वभूमीवर तणावाचे वातावरण असताना या परिस्थितीमध्ये आता मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसेकडून २५ नोव्हेंबरला मुदत संपत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत सर्व दुकानांवरील पाट्या २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत असाव्यात, असा निर्णय कोर्टाने दिल्याने निर्णयासंदर्भात अल्टिमेटम देणारे बॅनर्स लावले जात आहे. मराठी पाट्यांच्या संदर्भात तीन दिवसांचा कालावधी आता उरला, मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक, असा मजकूर असलेले बॅनर्सवर झळकत आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचा मुद्दा गाजण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »