ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार; उजनीसह भीमा खोऱ्यातील धरणांमधला पाणीसाठा चिंताजनक
कुर्डूवाडी: राज्यात यंदा म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे आत्ताच राज्यात पाण्याचे ४०० वर टँकर सुरु करण्यात आले आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये २४३ टीएमसी पाणी अपेक्षित होते.
धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती
पिंपळगाव जोगे (७८.४१ टक्के), माणिकडोह (७७.३९ टक्के), येडगाव (९४.८६ टक्के), वडज (९५.६८ टक्के), डिंभे (९५.०३ टक्के), घोड (९४.३४ टक्के), विसापूर (५३.९० टक्के), चिल्हेवाडी (९७.२३ टक्के), कळमोडी (९९ टक्के), चासकमान (९४. ६२ टक्के), भामा आसखेड (८६.७४ टक्के), वडीवळे (९४.८० टक्के), बांद्रा (८८.७८ टक्के), पवना (८६.८७ टक्के), कासारसाई (९२.५२ टक्के), मुळशी (८३ टक्के), देवधर (५७.६० टक्के), वरसगाव (९२ टक्के), पानशेत (९५.८० टक्के), खडकवासला (७३.५३ टक्के), गुंजवणी (९६ टक्के), निरा देवधर (९१.४६ टक्के), भाटघर (९०.७८ टक्के), वीर (५६ टक्के), उजनी (३३.५० टक्के).
नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस टॅंकर वाढत आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाचा टंचाई आराखडा ५०० कोटींनी अधिक असू शकतो, असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतीच म्हणा पावसाअभावी खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बीतून मोठी आशा आहे. परंतु, धरणातून वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बी हंगामालाही मोठा फटका बसू शकतो, अशी वस्तुस्थिती आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्यासाठी राज्यात एकही टँकर सुरु नव्हता. पण, यावर्षी २६ नोव्हेंबरपर्यंत पावणेचारशे गावे व एक हजार वाड्या-वस्त्यांना ४१४ टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. सध्या राज्यभरात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता ३० जूनपर्यंत राज्यात दोन हजारांपर्यंत टँकर सुरू असतील, असा अंदाज पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वर्तविला आहे.