उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेने एका शाळकरी मुलीचा मृत्यू


मोहोळ: उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी कुंभारखाणी (मोहोळ) परिसरात घडली. गुंजन जयपाल पवार वय 9 रा कुंभारखाणी असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडून जन महाराष्ट्र न्यूजला मिळालेल्या माहिती नुसार, गुंजन पवार ही शनिवारी सकाळी शाळा असल्याने घरी आई-वडिलांना शाळेला जाते म्हणून घरातून गेली. थोड्या वेळातच गुंजनचे वडील जयपाल पवार यांना त्यांच्या मित्राचा फोन आला व गुंजनला ट्रॅक्टरने धडक दिली आहे ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाजवळ पडल्याने तिच्या कमरेला जोराचा मार लागल्याचे सांगितले.

Advertisement

जयपाल पवार हे तातडीने त्या ठिकाणी गेले व गुंजनला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून ती उपचारा पूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची खबर जयपाल पवार वय 32 रा कुंभारखाणी यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »