मोठी बातमी,नगर कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, ८ जणांचा मृत्यू, एका कुटुंबातील चौघांचा समावेश
पुणे : (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांकडून स्थानिकांसह मदत कार्य चालू असल्याचे पुढे आले आहे. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत असून अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.
मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश. या अपघातातील मृतांची एकूण संख्या आठ आहे. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय ३०), कोमल मस्करे ( वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नाहीत.