मुळशी पॅटर्न, संदीप मोहोळच्या गाडीवर चालक ते गँगस्टर शरद मोहोळचा संपूर्ण प्रवास
पुणे :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) शरद मोहोळ याचा प्रवास थक्क करणारा आहे. संदीप मोहोळ याच्या गाडीवर चालक ते गँगस्टर असा हा त्याचा प्रवास होता. शेवटी गँगवारमधूनच त्याची हत्या झाली. त्याची हत्येचा सूत्रधार असणारा साहिल पोळेकर सात दिवसांपूर्वीच त्याचा गँगमध्ये आला होता.
पुणे शहरात गँगवार सुरु
२००६ मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची संदीप मोहोळ याने हत्या केली होती. या हत्येनंतर पुणे शहरात गँगवार सुरु झाले. सुधीर रसाळ याच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी मारणे गँगने संदीप मोहोळ याची हत्या केली. संदीप मोहोळ याची हत्याही मारणे गँगने नियोजनपूर्वक केली. संदीप मोहोळ मोटारीतून जात होते. ती मोटार बुलेटप्रूफ असल्याचे मारणे टोळीला वाटले. यामुळे पौड फाट्यावर त्यांची गाडी थांबताच गाडीचे काच फोडले. त्यानंतर संदीप मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडल्या.
शरद मोहोळ यांनी घेतला बदला
संदीप मोहोळ यांची हत्या झाली तेव्हा त्याची गाडी संदीप मोहोळ चालवत होता. ही घटना शरद मोहोळ याची गुन्हेगारी विश्वात एंन्ट्री करणारी ठरली. संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने गँगची सूत्रे हाती घेतली. २०१० मध्ये संदीप याच्या हत्येचा बदला घेतला. संदीप मोहोळ याची हत्या करणारा किशोर मारणे याची हत्या शरद मोहोळ याने केली. या हत्येसाठी शरद मोहोळ याला जन्मठेपीची शिक्षा झाली. त्या प्रकरणात तो जमिनीवर बाहेर आला.