कुर्डुवाडीत पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्यातच आयुष्य संपविले


कुर्डुवाडी :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) कुर्डुवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या दवाखान्यामध्येच कर्तव्यावर असताना कार्यालयातीलच छताच्या लाकडी वाश्याला एका दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दु ४ वा.दरम्यान घडली.

विश्वनाथ चिमाजी जगाडे (वय -३९,मूळ रा परभणी जिल्हा परभणी, सध्या कुर्डूवाडी ता.माढा) असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डूवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खासगी पशुवैद्य येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. गुरूवारी सकाळी सोलापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »