पिरंगुट येथे भौतिकशास्त्र विषय शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन


पुणे(प्रतिनिधी)-इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (IAPT) महाराष्ट्र रिजनल कौन्सिल या संस्थेद्वारा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगुट या ठिकाणी भौतिकशास्त्र विषय शिक्षकांचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्राच्या विषयाचे अभ्यासक्रम, अध्यापन व अध्ययन पद्धती, आव्हाने, संधी व भवितव्य यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. याशिवाय भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शैक्षणिक दृष्ट्या याचा फायदा सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषय शिक्षक व विद्यार्थी वर्गाला होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी सांगितले की,महाराष्ट्रभरातील १०० पेक्षा जास्त भौतिकशास्त्र विषय शिक्षक, संशोधकानी यात सहभाग नोंदविला होता. जेणेकरून या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थी वर्गास त्यांच्या बौद्धिक ज्ञानात अधिक भर पडून पदार्थ विज्ञान विषयात रुची निर्माण होईल. तसेच पदार्थविज्ञान शिक्षकांच्या विविध प्रकल्पांना चालना मिळेल.यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अड्व्होकेट मोहनराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे,IAPT संस्थेच्या सचिव डॉ रेखा घोरपडे, स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ शेवाळे, सचिव डॉ. लता जाधव,मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शर्मिला चौधरी तसेच उप प्राचार्य डॉ.प्रवीण चोळके,डॉ.शिवाजी शिंदे, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.भरत कानगुडे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.डॉ.महेश कांबळे,डॉ.स्मिता लोकरे,डॉ.गणेश लोणकर,हेमंत वाईकर यांनी नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले.वृत्त पत्र विभागाचे सर्व विद्यार्थी व प्रमुख प्रा.अश्विनी जाधव यांनी संपूर्ण अधिवेशनाचे वार्तांकन केले.आभार व प्रास्ताविक डॉ.प्रवीण चोळके व प्रा.कानगुडे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »