राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार व सामाजिक बांधिलकी जपावी-सौ.शितल ताई जैद
चाकण: दि.१६ रोजी मौजे जैदवाडी (ता.खेड) येथे कै भागूबाई पिंगळे कला ,वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय चाकणच्या राष्ट्रीय सेवा योजना उदघाटन समारंभ संपन्न झाला. दि २२ जानेवारी २०२४ पर्यंत हे शिबिर असणार आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. व्ही.ढेरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराविषयी सखोल माहिती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक महाविद्यालय चाकणचे प्राचार्य डॉ दौंडकर कैलास यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व विशद केले. तसेच जैदवाडी गावच्या सरपंच सौ.शितल ताई जैद यांनी त्यांच्या मनोगत मध्ये आमच्या गावाची निवड करून मागील वर्षा प्रमाणे या वर्षी देखील विविध योजना राबवून गावच्या विकासात योगदान देऊन आदर्श निमार्ण करावा अशी इच्छा व्यक्त करून शिबिरास शुभेच्छा दिल्या.शिबिर काळात गावामध्ये श्रमदान ,विविध विषयांवर व्याख्याने,सांस्कृतिक कार्यक्रम,गाव सर्वेक्षण,गटचर्चा इत्यादी कार्यक्रम होणार आहेत
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ .एन डी पिंगळे ,संस्था सचिव डॉ. शितल टिळेकर , अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानेश्वर दुधवडे ,प्रा. हनुमंत साठे ,कोयाळी गावचे सरपंच सतिश भाडळे,नंदा जैद ग्रा.सदस्य विकास जैद उद्योजक,भगवान जैद सोसायटी संचालक,मच्छिंद्र कोतवाल मा.उपसरपंच,सचिन जैद तंटामुक्ती अध्यक्ष,आनंद जैद सा. का जैदवाडी,पूजा जैद अंगणवाडी सेविका,ढवळे सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व जैदवाडी ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विविध शाखेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.केतन जैद यांनी केले तर आभार प्रा. संतोष बुट्टे यांनी मानले