लोणावळ्यातील पितापुत्राने साकारला मनोज जरांगे पाटील यांचा मेणाचा पुतळा


पुणे : सिद्धेश्वर कसबे(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) लोणावळ्यातील कार्ला येथे पितापुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे. कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये पुतळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे जरांगे हे प्रसिद्धी झोतात आले आहेत. ते मराठा आरक्षणासाठी आग्रही असून त्यांचं हे काम पुढील पिढीला कळावं म्हणून कार्ला येथील पुतळा आर्टिस्ट ऋषीकेश म्हाळसकर आणि अशोक म्हाळसकर या पितापुत्राच्या जोडीने जरांगे यांचा पुतळा साकारला आहे.

Advertisement

कार्ला येथे पितापुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे. यासाठी जरांगे पाटील यांना भेटून म्हाळसकर यांनी मेणाचा पुतळा बनवण्यासाठी परवानगी आणि मोजमाप घेतले होते. एरवी सहा महिने मेणाचा पुतळा बनवण्यासाठी लागतात मात्र, ऋषिकेश म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांत हा मेणाचा पुतळा साकारला आहे. बारकाईने आणि हुबेहूब पुतळा बनवणं हे म्हाळसकर यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. परदेशातून मेन आणून जरांगे यांचा पुतळा साकारण्यात आला आहे, अशी माहिती ऋषिकेश म्हाळसकर यांनी लोकसत्ता ऑनलाइन दिली आहे. पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »