श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
माढा :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) 26 जानेवारी 2024 श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाचीवाडी उ.बू येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रामेश्वर कोळी व सरपंच शंकर डोंगरे उपस्थित होते.
शाळेमध्ये ध्वजारोहनचा कार्यक्रम सकाळी साडे आठ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संयुक्त हस्ते संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ग्रा.पं सदस्य मारुती गोरे, पोलीस पाटील शंकर काळे, लखन गोरे, आण्णासाहेब डोंगरे, माजी सैनिक बळीराम सावंत, दत्ता जाधव, संजय निकम, दशरथ काळे, आबासाहेब सुतार, सिद्धेश्वर चव्हाण, सोमनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये देशभक्तीपर नारे देण्यात आले. यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय हिंदी महासभा व ड्रीम फाऊंडेशन यांच्यावतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल इम्रान मुल्ला सर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर मान्यवरांचा हस्ते गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यात तृतीय आलेल्या ओंकार मुळेचा सन्मान करण्यात आला. व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. विज्ञान प्रर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान मुल्ला सर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक पाटील काळे, मोरे सर,जाधव मॅडम, शिंदे मॅडम, थोरात मॅडम, शिंदे मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.