मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंडाचा फोटो, महाराष्ट्रात गुंडा राज.ट्विट करत संजय राऊत यांचा हल्लाबोल
पुणे -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे. त्यात पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. सोमवारी या दोन फोटोंवरील चर्चा सुरु असताना मंगळवारी संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़.