प्रहार शेतकरी संघटनेचे यश; प्रहारच्या जागरण गोंधळ आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर लोन मंजुरीचे पैसे जमा
माढा – सिद्धेश्वर कसबे (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लोन बाबत दुर्लक्ष करणाऱ्या युनियन बँकेच्या विरोधात प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी जागरण गोंधळ आंदोलन होणार होते. परंतु बँकेच्या शाखा अधिकारी यांनी चार दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करतो म्हणून सांगितले असले कारणाने प्रहार शेतकरी संघटनेचे जागरण गोंधळ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बँकेचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लोन मंजूर करत पैसे जमा केले त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर प्रहार शेतकरी संघटना कायम सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे मत प्रहार संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी मांडले.
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने शाखा अधिकारी, माढा तालुक्याचे तहसिलदार विनोद रनवरे यांचे आभार मानण्यात आले. त्याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी संतोष कोळी, आबासाहेब कोळेकर, रमेश तांबिले, गणेश सुतार, नितीन रंगा चव्हाण , दादासाहेब तांबिले आदी उपस्थित होते.