राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील आठ जणांची नावं निश्चित
पुणे -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या 56 जागांपैकी 6 जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यातील तीन जागा या भाजप खासदारांच्या असून त्यासाठी भाजपने महाराष्ट्रातून आठ जणांची नावं निश्चित केल्याचं वृत्त आहे.
ही यादी दिल्ली येथे पाठवण्यात आली आहे. ज्या 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यातील सहा जागा राज्यातील आहेत. माजी मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे, वंदना चव्हाण हे सहा खासदार निवृत्त होत आहेत.
या सहांपैकी तीन जागा भाजपच्या आहेत. त्यासाठी भाजपने आठ नावांची निश्चिती केली आहे. या आठ नावांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरिश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय, नारायण राणे यांचा समावेश आहे.