सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ४३१ कैदी, क्षमतेपेक्षा चौपट गर्दी


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) मध्यवर्ती कारागृहात घरफोडी, खून, हाणामारी, महिला अथवा तरुणीवर अत्याचार, विनयभंग, चोरी-दरोडा अशा विविध गुन्ह्यांतील तब्बल ४३१ कैदी आहेत. त्यात महिला कैद्यांचाही समावेश आहे. वास्तविक पाहता या कारागृहाची क्षमता अवघी १४१ कैद्यांचीच आहे.

दरवर्षी साधारणतः गुन्हेगारीत १० टक्के वाढ होते. किरकोळ कारणातूनही अनेकजण कायदा हातात घेऊ लागले आहेत. नात्यांचा विसर अनेकांना पडला असून, छुल्लक कारणांसाठी काहींनी स्वत:च्या आई-वडिलांचा, आजीचा देखील खून केल्याची उदाहरणे आहेत. दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयातून शिक्षा होईपर्यंत कैदी सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवले जातात.

Advertisement

सध्या सोलापूर कारागृह कैद्याने तुडुंब भरल्याने अनेक कैदी न्यायालयाच्या आदेशाने कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात देखील पाठविण्यात आले आहेत. खटल्याचा निकाल झाल्यावर शिक्षा लागलेल्या कैद्यांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील ४३१ कैदी मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. दरम्यान, आता शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तुरुंगाचा विस्तार केला जात असून, हे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी २४० कैदी आणखी बसू शकणार आहेत. तुरुंगात राहण्यापेक्षा गुन्हा न करता, किंवा कायदा हातात न घेता प्रत्येकानी आनंदाने राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »