शिंदे गटाच्या कुर्डूवाडी शहर प्रमुखपदी बागलचः मुंबईतून पत्र, सावंतांनी केलेली निवड फायनल


कुर्डूवाडी-(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) कुर्डूवाडी शिवसेना शिंदे गट शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक बबन बागल यांची नियुक्ती फिक्स करण्यात आली असून, मुंबई येथून शिंदे गट शिवसेना कार्यालयामधून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असणार आहे.

Advertisement

मध्यंतरी शिवसेना शहर प्रमुख पदावरून बरीच स्थित्यंतरे घडली होती. परंतु मुंबई कार्यालयातील शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र माजी नगरसेवक बबन बागल यांना देण्यात आल्यामुळे बागल शहराध्यक्षपदी फिक्स असणार आहेत. काही दिवसापूर्वी कुर्डूवाडी शहराध्यक्ष् नेमके कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र बागल यांना थेट मुख्य शिवसेना शिंदे गट कार्यालयातून नियुक्ती पत्र मिळाल्या मुळे राजकीय वातावरण निवळले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मेळावा घेऊन कुर्डूवाडी शहराध्यक्षपदी समाधान दास यांची नियुक्ती करून थेट शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या निर्णयाला डावलून निवडी जाहीर केल्या होत्या. कुर्डूवाडी येथील मेळाव्या सोलापूरचे संपर्क नेते संजय माशीलकर यांनीही यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे सावंत व माशीलकर यांच्या परस्पर निर्णयामुळे कुर्दुवाडी शहरप्रमुख पदावरून नक्की कोण हा प्रश्न होता. परंतु शिवसेना सचिव संजय मोरे यांनी मुंबई येथून बबन बागल यांना शहराध्यक्षपद नेमणूक दिल्याचे नियुक्तपत्र सोमवारी जारी केल्याने शहराध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »