एमआयएम सोलापुरातून यंदा स्वबळावर लढणारः प्रणिती शिंदेंच्या व्होटबँकेवर परिणामाची शक्यता


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) गेल्या लोकसभेला एमआयएमने वंचित बहुजन आघाडीसोबत लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर सोलापुरात वंचित-एमआयएमचे उमेदवार होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. या वेळी एमआयएमने सोलापूर लोकसभा स्वबळावर लढवण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी फारुख शाब्दी यांनी दिली. यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या व्होटबँकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पारंपारिक मुस्लिम मतांपासून त्यांना वंचित राहावे लागेल, असे दिसते.

२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित आणि एमआयएमचे उमेदवार डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.

Advertisement

वंचितचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत जातील की नाही याबाबत अजून चित्र स्पष्ट झाले नाही. वंचितसोबत येऊ दे किंवा नाही, मात्र एमआयएमचा उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावणार आहे. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघात लढत होईल, असे चित्र असताना एमआयएमचा उमेदवार आल्यास निवडणुकीचा खेळ रंगणार आहे.

एमआयएमचे सोलापूर प्रमुख फारूक शाब्दी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, एमआयएम पहिल्यांदाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तीन दलित उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केला असून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज पाठवले आहेत. पक्षातील वरिष्ठांशी बोलून लवकरच उमेदवार घोषित होईल, अशी माहिती फारूक शाब्दी यांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »