नवे मित्र शोधताना भाजपवाले जुन्या मित्रांना स्थान देत नाहीतः रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांची टीका


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरताना भाजपवाले सतत नवे मित्रपक्ष शोधत असतात. त्याविषयी आमचे काही म्हणणे नाही. पण असे करताना ते जुन्या मित्रांना हक्काचे स्थान देत नाहीत, अशी टीका रयत क्रांती पक्षाचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. महायुतीत हातकणंगले मतदारसंघ शिंदेसेनेला सुटला आहे. तेथे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आहे.

Advertisement

त्यामुळे खोत नाराज झाले आहेत. ते म्हणाले की, माने यांचे नाव जाहीर करताना महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही. या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. मी हातकणंगले मतदारसंघासाठी ‘शड्डू’ ठोकला आहे. आगामी लोकसभेत आपण आणि आपला पक्ष प्रस्थापितांचा प्रचार करणार नाही. रयत क्रांती संघटना ही राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज आहे. ती आता अधिक तीव्र केली जाणार आहे. २०१९ मध्येच मी हातकणंगलेत लढण्यासाठी ठाम होतो, पण युतीचा धर्म पाळून मी माघार घेतली होती. आता माघार शक्य नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »