प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुर जिल्ह्यात तीन सभा


माढा -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी, २ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून या दिवशी सोलापुरात तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. बार्शी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज मध्ये त्यांची सभा होणार आहे.

Advertisement

सोलापूर शहरात दुपारी तीन वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

सकाळी दहा वाजता लातूरला त्यांची सभा नियोजित आहे. त्यानंतर, साडे अकरा वाजता धाराशिव मध्ये त्यानंतर बार्शी, अकलूज तसेच सोलापूर शहरात त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती वंचितचे प्रवक्ते प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »