मतपेट्या घेऊन अधिकारी पोहचले गावोगावच्या मतदान केंद्रावर !


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सोलापूर व माढा लोकसभा निवडणूकीसाठी उद्या मंगळवार ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. मतदानासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहचले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगभग दिसून येत आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर व नूतन मराठी विद्यालयातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचे काम सुरू होते. मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेस, खासगी शाळांच्या बसेस व जीपची मदत घेण्यात आली आहे.

Advertisement

प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट व आवश्यक ते साहित्य देण्यात आले असून पेालिस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहचले आहेत. शहरातील सर्व मतदान केंद्रावर साहित्य पोहोचले असून ग्रामीण भागातील गावागावात साहित्य पोहच झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माढा मतदारसंघांमध्ये एकूण ३६ लाख ५६ हजार ८३३ मतदार आहेत. यामध्ये १८ लाख ९० हजार ५७२ पुरुष व १७ लाख १४ हजार ९७६ महिला आहेत आणि २८५ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण ३६१७ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »