आषाढी यात्रा: 65 एकरात प्लॉट बुकिंग सुरू; 35 दिंड्यांची पहिल्याच दिवशी नोंदणी, मोफत भूखंड, भक्तीसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील


पंढरपूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) आषाढी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी ६५ एकर येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ४९७ प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दिंड्यांचे बुकिंग सुरु झाले असून, ३५ दिंड्यांचे बुकिंग मंगळवारपर्यंत झाले आहे, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले आहे. या यात्रेला किमान १५ ते १८ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी सज्ज असते. यात्रेच्या अगोदरच पुर्वतयारी सुरु करण्यात आलेली आहे.

आषाढी यात्रेला येणाऱ्या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (६५ एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत.

भाविकांना प्लॉटस वाटप करणे,

Advertisement

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी पंढरपूर शहरात विविध भागात फिरून यात्रा नियोजनाची पाहणी केली. पत्राशेड दर्शन रांग, वाळंवट, ६५ एकर, भीमा बसस्थानक तसेच पालखी मार्ग व पालखी तळांची पाहणी केली. पाहणीवेळी पालखी मार्गाबाबत सूचना केल्या. या वेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते. अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत. दिंडी, पालखी समवेत येणाऱ्या भाविकांना भक्तीसागर ६५ एकर येथे प्लॉटसचे वाटप करण्यात येत आहे. दिंडी नोंदणी करण्यासाठी ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, याशिवाय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन नायब तहसीलदार, एक मंडलाधिकारी, दोन तलाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत. दिंडी, पालखी समवेत येणाऱ्या भाविकांना भक्तीसागर ६५ एकर येथे प्लॉटसचे वाटप करण्यात येत आहे. दिंडी नोंदणी करण्यासाठी ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, याशिवाय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन नायब तहसीलदार, एक मंडलाधिकारी, दोन तलाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

आषाढी एकदशीच्या सोहळ्याअगोदर दिंडी, पालखीतील भाविकांनी प्लॉटसाठी मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्या भाविकास प्राधान्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन केंद्रातून सेवा देण्यात येईल. यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे (मो. ९७६७२४८२१०), प्रवीणकुमार वराडे (मो. ९४०४९८३०४६) यांच्याकडे संपर्क करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »