पालखी मार्गावरील बंदोबस्तासाठी 1500 पोलिसः नातेपुते येथे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केली पाहणी
नातेपुते -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जुलै रोजी मुक्कामी असून या ठिकाणची कायदा व सुव्यवस्थेची पहाणी तसेच पोलिस बंदोबस्त पहाणी जिल्हा पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी करून अधिकारी व पोलिस यांना सूचना देऊन सतर्क रहाण्याचे सांगितले.
या पालखी सोहळ्यासाठी १५०० कर्मचारी बंदोबस्तात असून ४०० होमगार्ड, १००० पोलिस, १०० अधिकारी तैनात केले आहेत. तसेच प्रमुख मार्गावर फोंडशिरस चौक, दहीगांव चौक शिंगणापुर पाटी याठीकाणी नाकाबंदी असणार आहे. पालखी तळावर कडेकोट बंदोबस्त असून भाविक भक्ताची गैरसोयी होणार नाही, यांची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरपंचायत व पोलिस स्टेशन याच्या पुढाकाराने हॉकर्स टीमची नेमणूक करुन पालखी मुक्कामी मार्ग पिरळे रोड याठिकाणी गर्दी होणार नाही, यांची दक्षता घेतली जाणारआहे. तसेच या मार्गावर कोणतेही छोटे-मोठे व्यावसायिक बसू नयेत. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, नातेपुते पोलिस ठाण्याचे महारूद्र परजणे, मूख्यकार्यकारी अधिकारी माधव खांडेकर आदी उपस्थित होते.