उजनी धरणात 24 तासांत 14 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला, उजनी धरण प्लस मध्ये


इंदापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सोलापूर, पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मृत साठ्यातून बाहेर येऊन 0.13 टक्के भरले. 7 महिन्यांपूर्वी म्हणजे 21 जानेवारी रोजी हे दरण मृत साठ्यात गेले होते. त्यानंतर गत 56 दिवसांत त्यात 33 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. त्यात गत 24 तासांत 14 टक्क्यांची भर पडली.

Advertisement

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील 1 लाखावर असणारा विसर्ग सध्या घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत गेला आहे. सध्या बंडगार्डन येथून 41 हजार 571 क्युसेक विसर्ग असून दौंड येथून 1 लाख 48 हजार 149 क्युसेकने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. गेल्या 24 तासात उजनी धरणात ८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. आज शुक्रवारपासून उजनी उपयुक्त पाणी पातळीत येणार आहे. दरम्यान, हे धरण 100 टक्के भरल्यास ऊस लागवडीला वेग येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »