“.ठरवलं आणि वर्षभरातच आंदेकरला ठोकला”, मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडची कबुली


पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) आंदेकर टोळीने मागील वर्षी ऑक्टोबर महिण्यात सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्य निखील आखाडेचा खून केला होता. या खूनाचा बदला वर्षभरातच घेण्याची शपथ सोमनाथ गायकवाड याने घेतली होती. त्याच्या खूनाला वर्ष होण्याअगोदरच गायकवाडने वनराज आंदेकरचा खून करुन बदला घेतला. पोलिसांच्या तपासात गायकवाड याने ‘आंदेकरला वर्षभरातच ठोकायचे होते, त्याप्रमाणे आम्ही ठोकून दाखवले’ अशी कबुली दिली.

सोमनाथ गायकवाड हा आंदेकर टोळीचाच सदस्य होता. मात्र काही वर्षापासून तो टोळीतून फुटून त्याने स्वत:ची टोळी निर्माण केली. यानंतर दोन्ही टोळ्यांत धुसफुस सुरु झाली. सोमनाथ डोईजड जायला लागल्यावर आंदेकर टोळीने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचा विश्‍वासू साथीदार निखील आखाडेचा भर रस्त्यात चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केला.

हा खून गायकवाडे खूपच जिव्हारी लागला होता. तेव्हा अनिकेत दुधभातेवरही गंभीर वार झाले होते. या गुन्ह्यात सुर्यकांत उर्फ बंडू आण्णा रोणीजी आंदेकर, कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत आंदेकर आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली. यानंतर दोन्ही टोळ्यातील वैमनस्य वाढतच गेले. तेव्हाच सोमनाथ गायकवाडे आपल्या साथीदाराच्या खूनाचा वर्षभरात बदला घेण्याची शपथच घेतली होती.

Advertisement

दरम्यान आंदेकर टोळीतील सदस्य सोमनाथ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना नेहमी टपकवण्याची धमकी देत होते. यामुळे आपल्याला जीवंत रहायचे असेल तर आंदेकर टोळीला संपवलेच पाहिजे ही बाब गायकवाडच्या टोळीच्या लक्षात आली.

आंदेकरला संपवून मला मोठ व्हायचं होतं

यामुळे गायकवाड योग्य त्या संधीच्या शोधात होता. ही संधी त्याला कोमकर कुटूंबाच्या साथीने मिळाली. गायवाडने पोलिसांना सांगितले की, आंदेकर टोळीला संपवले तर मी मोठा होणार होतो. यामुळेही वनराज आंदेकरचा खून करणे महत्वाचे होते. यामुळे मागील एक ते दिड महिण्यापासून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होतो.

दोन्ही टोळ्यांतील सदस्यांची धरपकड

बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याने वनराजच्या खूनाची शिक्षा मारेकऱ्यांना मिळणारच. पुणे शहरात पुढील काही दिवसांत रक्तरंजीत इतिहास पहायला मिळेल असे वक्तव्य केले आहे. ही बाब गांभीर्याने घेत पुणे पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील इतर सदस्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यांच्यावरील पुर्वीचे गुन्हे तपासले जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना गजाआड केले जाणार आहे. जेणेकरुन बदल्याची ही आग काही काळ शांत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »