मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या बार्शी बंद, तहसिलदार यांना निवेदन…!
बार्शी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) मराठा आरक्षणसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवार 26 सप्टेंबर रोजी बार्शी शहर व तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मराठा समाज बांधवांच्यावतीने नायब तहसीलदार व बार्शी शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. मात्र, शासनाने अद्यापही त्यांच्या मागण्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे, राज्यातील विविध जिल्ह्यात बंद पुकारण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 26 सप्टेंबर रोजी हा बंद पुकारण्यात येत असून बार्शीतील समाज बांधवांनी याबाबत आज बार्शी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
यावेळी, माजी नगराध्यक्ष कृष्णराज बरबोले, माजी पंचायत समिती सभापती युवराज काटे, माजी नगरसेवक गणेश जाधव, बाबूराव जाधव, वैराग भागाचे मकरंद निंबाळकर, वंचितचे धनंजय जगदाळे, बंडू माने, महेश चव्हाण, ऋषिकांत पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.