आमदार म्हणुन एकदा संधी द्या, गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो; शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाचे टिपरू सुद्धा ठेवत नाही; अभिजीत पाटील


भूताष्टे- सिद्धेश्वर कसबे (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) २४५ माढा विधानसभा मतदासंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या सभेला भुताष्टे येथील नागरिकांनी उतस्फूर्तपणे गर्दी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदार संघात विविध गावांमध्ये गावभेट दौरा सुरू असून बैठकीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी युवा नेते पोपट अनंतराव यादव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला.

महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील सभेला संबोधित करताना म्हणाले की, गावचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात तुमच्या गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाचे टिपरू सुद्धा ठेवणार नाही आणि भाव सुद्धा सगळ्यांपेक्षा जास्त देणार आहे, त्यामळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही, सिना माढा उपसा जलसिंचन योजना मी निवडून आल्यावर बंद पडेल ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे ही योजना कधीच बंद होऊ देणार नाही अशा शब्दात अभिजीत पाटील यांनी सभेला संबोधित केले.

Advertisement

येत्या काळात माढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना मिळून कार्य करायचं आहे. मायबाप शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सर्वत्र करीत असलेलं स्वागत, देत असलेला प्रेम भरावून टाकणारं आहे, प्रस्थापितांच्या विरुद्ध एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला मैदानात उतरवून विकासाचं आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्यामुळे एकदा मला संधी द्या असे अभिजीत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी राजेंद्र नवनाथ यादव, युवा नेते समाधान रजपूत, जेष्ठ नेते लक्ष्मण तात्या कसबे, अमोल यादव, भारत बापू यादव, माऊली पाटील, दादा व्यवहारे, शिवसेना तालुका उपप्रमुख राहुल यादव, बालाजी कांबळे, बाळबप्पा यादव, बापूनाना यादव, पंकज यादव यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »