पांगरी येथे जागतिक अपंग दिनानिमित रुग्णांना फळे वाटप, आधार ग्रुपचा सामाजिक उपक्रम
बार्शी- प्रतिनिधी/जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क- बार्शी तालुक्यातील पांगरी येथे जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन साजरा केला जातो. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. त्याच भावनेने पांगरी येथील आधार ग्रुपचे प्रमुख राहूल बगाडे आणि बिरूदेव क्षिरसागर दिव्यांग बांधव ज्ञानेश्वर कुंभार याचे सहकार्याने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
Advertisement
यावेळी आधार ग्रुपचे दादा क्षीरसागर, शिवाजी गायकवाड, सचिन ठोंबरे, अनिल काकडे, डॉ. यादव मॅडम व सर्व स्टाफ हजर होता.

