उत्तम जानकर यांच्यावर मारकडवाडी प्रकरणी गुन्हा


अकलूज -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

आमदार जानकर आणि त्यांच्या प्रमुख १७ समर्थकांसह सुमारे २०० गावकऱ्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यात पहिला गुन्हा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आहे. तर, दुसरा गुन्हा चाचणी मतदान प्रक्रियेसाठी यापूर्वी अधिकृतपणे झालेल्या ईव्हीएम मतदान प्रक्रियेच्या विरोधात समाजात गैरसमज पसरवणे, अफवा पसरविल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार जानकर यांनी, या विरोधात येत्या आठवडाभरात माळशिरसच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »