शेतीला पाणी देण्यावरुन वाद विकोपाला, तुंबळ हाणामारीत चार जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
येरमाळा -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. . शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बावी गावात दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले.
जखमींना हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले पण यातील चार जणांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला. तर, दोन जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शेतीच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी येथील येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून येरमाळा पोलिसांनी 10 आरोपींना संशियत म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. केवळ शेतामधील पाणी हेच वादाचे कारण आहे की दुसरं काही, याचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.
हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. या दोन्ही कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून शेतात पाणी देण्यावरून वाद सुरू आहे. मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. मात्र, हा विकोपाला गेल्याने दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली, ज्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एका गटातील दोन आणि दुसऱ्या गटातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आप्पा काळे, सुनील काळे आणि वैजनाथ काळे यांचा समावेश आहे. जखमी असलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेवर उपचार सुरू आहेत.