बार्शीतील 22 वर्षीय युवतीने आपल्या सूत्रसंचालन ने गाजविले बार्शी हाफ मॅरेथॉनचे मैदान
बार्शी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) 5 जानेवारी 2025 रोजी हेल्थ क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी टाऊन, बार्शी रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी हाफ मॅरेथॉन 2 रे पर्व चे आयोजन केले होते, हीं स्पर्धा अंतरराष्ट्रीय दर्जाची भरविण्यात आली होती, यात दिल्ली, बेंगलोर, मेंगलोर, बेळगांव सह संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता, यावेळी आयोजकांकडून सहभागी प्रत्येक स्पर्धकास टी -शर्ट, टाईम चिप (BIB), मेडल, नाष्टा देण्यात आला होता, आणि इतक्या मोठ्या इव्हेन्ट साठी महत्वाचे असते ते सूत्रसंचालन (Anchoring). बार्शीतील कु. ईश्वरी विशाल मोरे या 22 वर्षीय तरुणीने हे शिवधनुष उचलले, मराठी, इंग्रजी, हिंदी मिक्स भाषेत अखंड 6 तास सूत्रसंचालन करत तिने जवळपास 1500 स्पर्धकांना ग्राउंड वर प्रोत्साहित केले.
इतक्या मोठ्या इव्हेन्ट साठी सहसा अनुभवी सूत्रसंचालक यांना बोलविले जाते, परंतु ईश्वरीला दिलेल्या संधीचे सोने करत तिने बार्शी हाफ मॅरेथॉन इव्हेन्ट गाजवीला, तसेच दि. 4 जानेवारी 2025 रोजी झालेल्या व्हॉइस ऑफ बार्शी या कराओके गाण्याच्या स्पर्धेचे देखील सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट रित्या ईश्वरीने केले. त्यामुळे तिचे सर्व रनर्स, कला प्रेमी आणि सर्व घटकातून कौतुक होत आहे, बार्शी हाफ मॅरेथॉन हा अंतरराष्ट्रीय दर्जाचा इव्हेन्ट बिग सक्सेस ठरला यासाठी बार्शीतील लोकांनाच संधी देण्यात आली होती, सागर सुतार फोटोग्राफी टीम ने एक ना एक रनर्स फोटो उत्कृष्ट आणि अचूक टिपले, तसेच हे फोटो QR कोड स्कॅन करून आपला सेल्फी अपलोड केल्यास विनामूल्य स्पर्धकांना डाऊनलोड करण्याची सुविधा देखील करण्यात आली आहे, राहुल झोंबडे साउंड सिस्टीम मुळे आणि बालाजी कला मंडप, उत्कृष्ट डिजिटल, बॅनर्स आणि सर्व स्पॉन्सर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा यशस्वी कार्यक्रम ठरला. यासाठी भगवान लोकरे सर, युवा उद्योजक विशाल मोरे, आयर्न मॅन महावीर कदम, आयर्न मॅन अमृत खेडकर, चेतन चव्हाण, उमेश काळे सर, राहुल कांबळे, दीपक धावारे, सागर सोत्रे, पद्मसिंह पवार, वैशाली जाधव, प्रज्ञा शेंडगे मॅडम सर्व हेल्थ क्लब सदस्य, लेडीज हेल्थ क्लब टीम, वृक्ष संवर्धन समिती,मोरया क्रिकेट क्लब, सोजर फिटनेस क्लब यांनी परिश्रम घेतले. बार्शीचे नाव आता उत्कृष्ट मॅरेथॉन आयोजन करणारे गाव म्हणून देशात गाजत आहे.