वाल्मीकच्या आवाजाचे नमुने आज घेणारः सीआयडीकडून कराडचे 3 मोबाइल जप्त, खंडणीतील आरोपी चाटेच्या घराची करणार तपासणी


बीड -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) २ कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेतीलवाल्मीक कराडचे ३ मोबाइल सीआयडीने जप्त केले. मात्र, अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. यासाठी बुधवारी चाटेला केज ठाण्यात नेऊन त्याची चौकशीकेली गेली. त्याच्या घराची झडती घेतली जाणार आहे. आज सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे.

देशमुख यांच्या हत्येनंतर २ कोटींच्या खंडणीचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुलेवरगुन्हा नोंद आहे. १८ डिसेंबरपासून चाटे तर ३१ डिसेंबरपासून कराड सीआयडी कोठडीत आहे. तपासात चाटेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानेचकराडचे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतस्वतःच्या मोबाइलवरून बोलणे करून दिलेहोते. त्यामुळे चाटे व कराड यांचे मोबाइल जप्तकरण्याची प्रक्रिया सीआयडीला करावी लागणार आहे. चाटेचा मोबाइल अद्यापहीसीआयडीला मिळालेला नाही, तर कराडनेआपले ३ मोबाइल सीआयडीकडे सोपवलेआहेत. मंगळवारी हे मोबाइल जप्त करण्यातआले. या ३ मोबाइलची फॉरेन्सिक तपासणीकेली जाणार आहे. मोबाइलवरील संवादाचाआवाज कराड याचाच असल्याची याचीपडताळणी केली जाणार आहे. यासाठीकराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाणारआहेत. बुधवारीच सीआयडीकडून आवाजाचेनमुने घेतले जाणार होते. मात्र चाटेच्याचौकशीत अधिक वेळ गेल्याने आज गुरुवारीवाल्मीक कराडच्या आवाजाचे नमुनेसीआयडीकडून घेण्यात येणार आहेत.

Advertisement

आरोपी सुदर्शन घुले याने ज्या ३३३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओतून देशमुख यांचे अपहरणकेले ती काळ्या रंगाची कार खुनानंतर सोडून आरोपी फरार झाले होते. सुरुवातीला बीडपोलिसांनी ही कार जप्त करून एसपी कार्यालयात ठेवली होती. बुधवारी ही कारसीआयडीने केज पोलिस ठाण्यात आणली. कराडने वापरलेली कारही जप्त केली आहे.

विष्णू चाटेची संपर्क कार्यालयात नेऊन चौकशी

विष्णू चाटे याचे केज शहरात बीड रस्त्यावर संपर्क कार्यालय आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्यादुसऱ्या दिवशी संतप्त लोकांनी चाटेच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करूनतोडफोड केली होती. बुधवारी दुपारी सीआयडीने चाटेला या संपर्क कार्यालयात नेऊनअर्धा तास चौकशी केली, तर जयराम चाटेलाही केजमध्ये आणले होते.

कराड व त्याच्या पीएकडे १७मोबाइल असल्याचा आरोप

वाल्मीक कराड व त्याचा पीए नितीनकुलकर्णी हे १७ मोबाइल वापरत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी पुण्याच्यासभेत केला होता. मात्र सीआयडीकडेकराडने तीनच मोबाइल दिले आहेत. त्यामुळेइतर मोबाइलचा शोध घेतला जात आहे.

सीआयडीने नोंदवला वायबसे दांपत्याचा जबाब

हत्या प्रकरणात सीआयडीने मंगळवारीरात्री डॉ. संभाजी वायबसे व त्याच्यापत्नीचा जबाब नोंदवला. खुनाच्याघटनेनंतर हे दांपत्य फरार होते. त्यांनासुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेनेचौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतरआरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली होती. चौकशीनंतर वायबसेदांपत्याला नोटीस देत सोडले होते. आतागुन्हे शाखेनंतर सीआयडीनेही त्यांचाजबाब नांदवला आहे.

आरोपी सुदर्शन घुले हा डॉ. संभाजी वायबसे याचा निकटवर्तीय समजलाजातो. मुकादम असलेल्या डॉ. वायबसेने अनेक कामांत घुलेची मदत घेतल्याचे, आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »