सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; मुख्याध्यापक ठार, एकजण जखमी


मोहोळ-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) भरधाव मालट्रकने पाठीमागून स्कुटीला जोराची धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या दरम्यान सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या हद्दीत घडली. राजेंद्र सुखदेव कारंडे (वय ५७, रा. यावली, ता. मोहोळ) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.

Advertisement

 

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कारंडे हे मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान राजेंद्र कारंडे व विजय नामदेव राऊत (वय ६५, रा. यावली) स्कुटीवरून (एम.एच.१३, सी. वाय.४१७०) मोहोळच्या दिशेने जात होते. यावेळी पुण्याकडून मोहोळच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मालट्रकने (के . ए.५६, ५६२५) पाठीमागून जोराची धडक दिली. स्कुटी चालवत असलेले राजेंद्र हे रोडवर पडले. व पाठीमागून आलेल्या मालट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

तर त्यांच्या पाठीमागे बसलेले विजय राऊत हे रोडच्या साईडपट्टीवर जखमी अवस्थेत पडले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी राऊत यांना सोलापूरला रुग्णालयात नेले. या अपघातप्रकरणी मालट्रक चालक वाहिद जाफरसाब (रा. निथुर, ता. भालकी, जि . बिदर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. समाधान श्रीधर कारंडे (रा. यावली) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदलिंगे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »