वैराग भागात वाढला वाघाचा मुक्काम
वैराग-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) अनेक दिवसांपासून बार्शी तालुक्यात वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने वैराग परिसरात आपला मुक्काम वाढलवला असून, तीन दिवस जनावरांवर हल्ला केला आहे. पहिल्या दिवशी मुंगशी (आर) परिसरात दोन जनावरां वर हल्ला केला त्यानंतर सासुरे व शेळगाव हद्दीत हल्ल्यात दोन वासरांवर मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी वैराग येथील लाडोळे तळ्याजवळ विनायक खेंदाड यांच्या बैलावर जीवघेणा हल्ला करून एक पाय खाऊन टाकले. वनविभाग माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या घटनेनं वैराग भागात एकच खळबळ उडाली आहे या दोन घटना रात्रीच्या घडल्याने शेतकरी रात्री रानाकडे जात नव्हते परंतू गुरवारी अचानक सकाळी वैराग येथील लाडोळे तळ्याजवळ विनायक महिपती खेंदाड यांच्या बैलावर जिवघेणा हल्ला करून एक पाय खाऊन जखमी केले त्याठिकाणी वनविभागाचे अधिकारी धनंजय शिदोडकर व सचिन पुरी यांनी तात्काळ भेट दिली व तेथील ठस्यांवरून हे कृत्य वाघानेच केले असल्याचे सांगितले त्यामुळे दिवसाही शेतकरी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे वैराग भागातील शेतकरी रात्री लाईट असल्याने शेतात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत त्यामुळे दिवसेंन दिवस अशा घटना वाढत असताना वनविभाग मात्र शांततेनं काम करताना दिसत आहे परंतू अशा घटनेत एखादया मनुष्यावर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण व अशा घटनेची वनविभाग वाट पाहातय का, असा प्रश्न उपस्थित केला जात असे.
आमची टिम ट्रॅप कॅमरे लावणे ठश्यांची तपासणी करणे, नागरिकांमध्ये जागरूकता करणे या गोष्टी करत आहे. बार्शी व वैराग परिसरातील घटनांचा अहवाल वनविभागाने सोलापूर, पुणे, नागपूर येथे वरिष्ठांकडे सादर केला . परंतू शासकिय स्तरावरून वाघाला पकडण्यासाठी आदेश आला नाही, आदेश आल्यानंतर पकडण्यासाठी कार्यवाही होईल.
-अलका करे, वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी