सोलापूरच्या प्रशासनात ‘यंग ब्रिगेड’! जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक थेट IAS, IPS; सगळेच चाळीशीच्या आतील अधिकारी


सोलापूर- प्रतिनिधि/जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क: विकासाच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी जेवढी महत्त्वाची भूमिका बजावतात, तेवढीच महत्त्वाची भूमिका सनदी अधिकारीही बजावतात. सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनातील पाच प्रमुख अधिकारी हे तरुण आहेत. या पाचही अधिकाऱ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रशासकीय सेवेला सुरवात केली आहे. जिल्हा प्रशासनात असलेल्या या चाळीशीच्या आतील यंग ब्रिगेड व थेट आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांमुळे सोलापूरकरांच्या विकासाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनातील सर्वच प्रमुख पदांवर पदोन्नतीने आलेले अधिकारी होते. सध्या जिल्हा प्रशासनात कार्यरत असलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हा प्रशासनातील पाचही प्रमुख अधिकारी तरुण व थेट आयएएस/आयपीएस उत्तीर्ण होऊन आलेले आहेत. खूप वर्षानंतर सोलापूरच्या जिल्हा प्रशासनात तरुण व थेट आयएएस/आयपीएस अधिकारी आले आहेत. त्यामुळे प्रशासनात येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी नवा जोष, उत्साह दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी

Advertisement

• नाव : कुमार आशीर्वाद
• वय : ३७ (१९८८)
• शिक्षण : आयआयटी
• युपीएससी उत्तीर्ण : २०१६
• आतापर्यंत सेवा : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
• जिल्ह्यात कार्यरत : २१ जुलै २०२३ पासून

पोलिस अधीक्षक

• नाव : अतुल कुलकर्णी
• वय : ३९ (१९८५)
• शिक्षण : बीई कॉम्प्युटर
• युपीएससी उत्तीर्ण : २०१५
• आतापर्यंत सेवा : मीरा भाईंदरचे एएसपी, गोंदिया व चंद्रपूरचे अपर पोलिस अधीक्षक, धाराशिवचे पोलिस अधीक्षक
• जिल्ह्यात कार्यरत : १५ ऑगस्ट २०२४ पासून

पोलिस आयुक्त

• नाव : एम. राजकुमार
• वय : ४० (१९८५)
• शिक्षण : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
• युपीएससी उत्तीर्ण : २०१०
• आतापर्यंत सेवा : एएसपी उमरगा, गडचिरोली, डीसीपी सायबर क्राईम मुंबई, पोलिस अधीक्षक यवतमाळ, अहिल्यानगर व जळगाव
• जिल्ह्यात कार्यरत : ५ फेब्रुवारी २०२४

महापालिका आयुक्त
• नाव : डॉ. सचिन ओम्बासे
• वय : ३९ (१९८५)
• युपीएससी उत्तीर्ण : २०११ मध्ये ‘आयआरएस’, २०१४ मध्ये ‘आयएएस’
• शिक्षण : एम. बी. बी. एस.
• आतापर्यंत सेवा : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा, जिल्हाधिकारी, धाराशिव
• जिल्ह्यात कार्यरत : २० फेब्रुवारी २०२५ पासून

मुख्य कार्यकारी अधिकारी

• नाव : कुलदीप जंगम
• वय : ३१
• शिक्षण : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग
• युपीएससी उत्तीर्ण : आयपीएस २०१९, आयएएस २०२०
• जिल्ह्यात कार्यरत : ३० ऑगस्ट २०२४ पासून
• आतापर्यंत सेवा : बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »