गजा मारणे काही सुधरेना, पोलिसांनी आता ‘पुण्याच्या मालका’चं कंबरडं मोडलं; 10 वर्षातली मोठी कारवाई
पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पुणे शहरातील कोथरुड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती, हे सर्व आरोपी गज्या मारणे गँगशी संबंधित आहेत. पुण्याचे मालक असे रील्स सोशल मिडीयावर टाकून दहशत करणाऱ्या गजा मारणे टोळीचे कंबरडे पुणे पोलिसांनी पुरत मोडायचं ठरवल आहे. पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गज्या मारणेसह टोळीवर मकोका दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कारवाईमध्ये मारहाण करणाऱ्या तिघांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण 27 आरोपी आमच्या रडारवर आहेत. टोळीप्रमुखावरही कारवाई केली जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती डीडीआरकडून आणि त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे. हे सगळे आरोपी त्या दिवशी एक चित्रपट पाहायला गेले असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींवर मकोका लावण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच आरोपी ज्या मारणे टोळीशी संबंधित आहेत त्या टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सागितले आहे.
आतापर्यंत किती गुन्हे दाखल?
गजा मारणे यांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी असे तब्बल 28 गुन्हे दाखल .
गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांकडून 2014 पासून चौथा मकोका ..
अमोल शिंदे , पप्पू गावडे खून प्रकरणात 2014 साली दोन मकोका
वकीलाकडून खंडणी मागितल्याप्रकरणात 2022 साली मकोका
गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण
पुणे शहरात बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय 35 शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय 31 , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय 35, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी त्यांची नावे आहेत. या मारहाण प्रकरणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस आयुक्ता यांच्यावरती नाराजी दर्शवत गंभीर टीका केली होती.
आरोपी फरार
गजा मारणे याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर मारणे टोळीचे धाबे दणाणले आहेत. यातील काही आरोपी फरार असून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.फक्त राजकीय हस्तक्षेप झाला नाही तरच हे प्रकरण तडीला जाईल अन्यथा मंत्रालयातून गज्याला मकोकातून बाहेर काढण्यासाठी हालचाली होणं पुणे पोलिसांसाठी नवीन नाही

