बाजार समितीसाठी बळीराम साठेंसह १४७ जणांचे अर्ज
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ७८७ अर्जाची विक्री झाली आहे. त्यातील २०९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंसह १४७जणांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल केले. शुक्रवारी (दि. २८) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी तब्बल १६२ जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. तसेच १४७जणांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, बाजार समितीच्यानिवडणुकीसाठी अर्ज खरेदी करणे, दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असल्याने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी हे धावपळ करत आहेत.
मतदारसंघनिहाय दाखल झालेले अर्ज
• सहकारी संस्था सर्वधारण ८०
सहकारी संस्था महिला राखीव – १५
• सहकारी संस्था इतर मागासवर्ग९
सहकारी संस्था विमुक्त जाती
भटक्या जमाती
१७ ग्रामपंचायत सर्वसाधारण ४१
ग्रामपंचायत
अनुसूचित जाती, जमाती –
८ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक – ४
व्यापारी प्रतिनिधी – २७
हमाल तोलार प्रतिनिधी ८
एकूण – २०९
आ. कल्याणशेट्टींनी अर्ज भरावा
बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी किंवा मिलन कल्याणशेट्टी यांनी अर्ज भरावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ते शेवटच्या दिवशी अर्ज भरणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.