उजनीचा पाणीसाठा 20 टक्क्यांवर


टेंभुर्णी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आला असून धरणात 11 टीएमसी उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला सतत पाणी देण्याचे वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.

सध्या उजनी धरणातून 2950 क्युसेकने कालव्यामध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यासोबत इतर पाणी योजना, बाष्पीभवन यामुळे उजनीतून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. धरणातून पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी पाईप व केबल वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपड करत आहे. सध्या उजनी काठावर अनेक शेतकर्‍यांनी नदी पात्रात चार्‍या काढून विद्युत पंपापर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पाणीसाठा अधिकच खालावल्याने आता पाणी देताना चारीचा आधार घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

दरवर्षी धरणग्रस्त शेतकर्‍याच्या नशिबातच पाण्यासाठी संघर्ष लिहिला असल्याचं मत अरविंद जगताप यांनी व्यक्त केल. उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकरी संघटित नसल्यामुळे राजकीय नेते मंडळी याचा फायदा घेऊन केवळ मतांचं राजकारण करून या भागातील शेतकर्‍यांचा मतापुरता वापर करून घेतात; मात्र धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी ठोस काम करत नाहीत. हीच परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी पाईप, केबल व चार्‍या काढण्यासाठी शेतकर्‍याला लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावत आहे.

Advertisement

मूळ सिंचन आराखड्यात राखीव पाण्याची तरतूद आली तरी या भागातील शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत. पाणीपट्टी भरण्यास कमी पडत असल्याने उजनी धरणग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचं पाणी आजपर्यंत राखीव ठेवता आल नाही.

या बाबत यांच्याशी संपर्क साधला आसता

20 जुलै 2019 च्या शासन निर्णयांनुसार राज्यातील सर्व धरणांतील पाण्याच्या वापराबाबत प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यानुसार पशुधन, पिण्यासाठी, आरोग्य व घरगुती वापरासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर कृषी (सिंचनाकरिता वापर), नंतर औद्योगिक वापर, पर्यावरण, करमणूक व शेवटी इतर वापर असा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पाइपलाइन पूर्ण होईपर्यंत नदीपात्रातून पिण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. यामध्ये मोट्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. हेच पाणी धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवता येणे शक्य होईल.

-रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता उजनी धरण

उजनीतील हक्कच पाणी मिळवण्यासाठी उजनी काठावरील शेतकर्‍यांनी एकत्र आले पाहिजे. याबाबत न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही.
-अरविंद जगताप, उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »