श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चैत्रीत 2 कोटी 56 लाख उत्पन्नः मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला मिळालेल्या उत्पन्नात दुप्पट वाढ


पंढरपूर–(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला लाडूप्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीस 2 कोटी 56 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

दरम्यान, मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा समितीच्या उत्पन्नात दुप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. मंदिर जीर्णोद्धार कामानिमित्त मागील वर्षी पदस्पर्श दर्शन बंद होते, त्यामुळे उत्पन्न कमी झाले होते. यंदा चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून जवळपास 3 लाख भाविक आले होते. चैत्र शुध्द 1 (दि. 30 मार्च) ते चैत्र शुध्द 15 दिनांक 12 या कालावधीत 2 कोटी 56 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Advertisement

या दानातून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असे श्रोत्री यांनी मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दि. 15 ते 21 एप्रिल, 2024 या चैत्री यात्रा कालावधीत पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. पदस्पर्श दर्शन बंद होते. त्यामुळे गतवर्षी उत्पन्न कमी झाले. यावर्षी उत्पन्नात वाढ झाली.

मागील वर्षीच्या चैत्री यात्रेत रुपये 1 कोटी 26 लाख 73 जात 788 वया वर्षीच्या यात्रेत रुपये 2 कोटी 56 लाख 55 हजार 55 रुपये इतके उत्पन्न मिळाले असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.1 कोटी 29 लाख 81 हजार 267 इतकी वाढ झाल्याचे यंदाच्या चैत्री वारीच्या उत्पन्नावरून दिसून येत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »