परळीत EVM सोबत छेडछाड, गप्प राहण्यासाठी दिले 10 लाख रुपये; बीडचे निलंबित PSI रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट


पुणे- (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये देण्यात आले, असा धक्कादायक गौप्यस्फोट बीडचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांनी केला आहे.

गुरुवारी पुणे विमानतळावर रणजीत कासले हे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. तसेच आपण बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचं सांगितलं.

Advertisement

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत रणजीत कासले म्हणाले की, “मी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती. ईव्हीएमजवळ थांबायचं नाही, यासाठी माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये देण्यात आले. वाल्मीक कराड मला भेटले होते.” ते म्हणाले, “परळीजवळ राखेच्या सेंटरजवळ आमची भेट झाली होती. आमची मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी ते आले होते. मला शांत राहायला सांगण्यात आलं होतं. लोकसभेला बोगस मतदार करू दिलं नाही. यावेळी शांत राहा, असं मला सांगण्यात आलं होतं. बीडचे ॲडीशनल एसपी जे चार वर्षांपासून आहेत, एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत ते वाल्मीक कराडचे हस्तक आहेत.”

कासले म्हणाले, “ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचे. ईव्हीएमध्ये काही छेडछाड होईल, ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. परळीला जेव्हा मतदानावेळी अपुरं मनुष्यबळ होतं त्याचवेळी कासलेंची ईव्हीएमजवळची ड्युटी का काढली? यांना रेस्ट का दिला? यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाऊंटवर 10 लाख रुपये का जमा झाले? हे प्रश्न विचारल्यास सगळी उत्तरे मिळतील.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »