वैद्यकीय क्षेत्रात खळबळ; सोलापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी केली आत्महत्य
सोलापूर— (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज संध्याकाळी 9 वाजण्याचा सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Advertisement
डॉ. वळसंगकर हे शहरातील एक प्रख्यात न्युरोसर्जन म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण काय, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.