राज्यात उष्णतेची लाट कायम; उद्या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या
सोलापूर –(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहील, परंतु दुसरीकडे, काही जिल्ह्यांनी त्याच वेळी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामानशास्त्रानुसार, या भागात कमी हवेच्या दाबामुळे वातावरणात बदल होतात. ढग तयार होण्याची, पाऊस पडण्याची किंवा वादळ येण्याची शक्यता असते.
ओडिशापासून पश्चिम बंगालपर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे या भागात पाऊस किंवा वादळी हवामान येऊ शकते. मध्य छत्तीसगडपासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक ट्रफ रेषा आहे. ती विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून जात आहे. त्यामुळे या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेनंतर, हवामान पुन्हा एकदा बदलले आहे. १ मे पूर्वी राज्य पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटाला तोंड देत आहे. २७ आणि २८ एप्रिल रोजी अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
२६ एप्रिल रोजी सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल. शेतकऱ्यांना हवामानाचे गंभीर संकट येत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सांगली जिल्ह्यांत २७-२८ एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.