राज्यातील 6 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; दोन पोलीस अधिकाऱ्यांना बढती
मुंबई/प्रतिनिधी: महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच आहे. अशातच आता राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृहविभागाने बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचाकपदी बढती देण्यात आली आहे.
गृहविभागाचे सह सचिव व्यकंटेश भट यांनी शुक्रवारी संबंधित सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. त्यात राज्याचे नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभातकुमार यांना बढती देऊन त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची राज्याच्या लोहमार्ग विभागाच्या पोलीस महासंचालकपदी, राज्याचे नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात, प्रशिक्षण व खास पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची राज्य राखीव पोलीस बलात आहे.
तसेच प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची प्रशिक्षण व खास पथकात तर लोहमार्ग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली दाखविण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्या नव्याने नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आले आहे.
या सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला?
1. प्रभात कुमार – संचालक, नागरी संरक्षण ( महाराष्ट्र राज्य, मुंबई)
2. प्रशांत बुरडे – पोलीस महासंचालक , लोहमार्ग
3. सुनिल रामानंद- अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग
4. राजकुमार व्हटकर – अप्पर पोलिस महासंचालक (रा. रा. पोलिस बल)
5. के. एम. मल्लिकार्जुन – अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण आणि खास पथके)
6. प्रवीण साळुंके – अप्पर पोलिस महासंचालक , महामार्ग सुरक्षा