जूनमध्ये मान्सून खोळंबणार, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको!


सोलापूर/प्रतिनिधी: नैऋत्य मान्सून सध्या मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. तो मुंबई, कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागात, बंगळुरूसह तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग इथपर्यंत पोहोचला आहे. परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळ परिवलन मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत विस्तारित आहे. २७ मे रोजी पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरातर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांना ब्रेक कशामुळे?

कोरडी हवा मान्सूनसाठी घातक ठरते. कारण ती मान्सूनच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणास बाधा पोहोचवते. मान्सून म्हणजे ऊबदार, आर्द्र हवासमूहांमुळे होणारा पाऊस. जर हवा कोरडी असेल, तर ती बाष्पीभवन कमी करते, ज्यामुळे ढग तयार होण्यास मदत होत नाही. कोरड्या हवेचे मान्सूनवर परिणाम होतात.

आर्द्रता कमी होणे

Advertisement

कोरड्या हवेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते. ही आर्द्रता ढगांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. आर्द्रता कमी झाल्यास ढग तयार होत नाहीत आणि पाऊस पडत नाही.

पेरणीलायक पाऊस कधी?

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस विश्रांती घेणार, शेतीची कामे उरकवा : २७ मे ते १ जूनदरम्यान संपूर्ण राज्यात चारही विभागात पावसाची शक्यता ही विखुरलेल्या आणि गडगडाटी स्वरूपात राहील. पावसाचे प्रमाण हे मुंबई, कोकण, नगर, पुणे आणि नाशिक या भागात जास्त राहील. कमी वेळेतच जास्त पाऊस अनुभवायला येईल. बाकी विभागात १ ते ६ जूनपर्यंत सूर्यदर्शन राहील. यावेळी शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीची कामे उरकून घ्यावीत आणि पुढे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

“साधारण पेरणीलायक पाऊस हा विदर्भात १३ जून, मराठवाडा २१ जून आणि उत्तर महाराष्ट्रात १७जूनपासून अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांनी आताच्या मान्सूनपूर्व ओलीवर पेरणी केली तरी चालेल.”
– अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »