‘बनावट चक्री अँपद्वारे दीड कोटींची फसवणूक’; कुर्डुवाडी पोलिसांत २१ जणांवर गुन्हा; आठ जणांना अटक


कुर्डुवाडी/प्रतिनिधी: बेकायदा ऑनलाइन चक्रीचे बनावट अँप तयार करून ते अधिकृत असल्याचे भासवले. एजंटांकडून याचा प्रसार करून ७ जणांची सुमारे एक कोटी ४८ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आठजणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

फनरेप फनगेम कंपनीचे मालक, फनरेप फनगेम कंपनीचे डिस्ट्रिब्यूटर नितीन पाटमस, रणजित सुतार, वैभव सुतार, स्वप्नील नागटिळक, राहुल चौथे, धीरज किरवे, अमरदीप पंचिरे, योगेश गाडे, गणेश देवकते (दोघे रा. बार्शी) यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बालाजी खारे (रा. लऊळ) यांनी ऑनलाइन चक्रीमध्ये फसवणूक झाल्याची फिर्याद कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे यांनी चार जणांना अटक केली होती. त्यानंतर पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »