डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा
आकुर्डी-(जनमहाराष्ट्र न्यूज नेटवर्क) विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी यासाठी डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे, डॉ. डी. वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. डी. वाय . पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्त मौजे शेलारवाडी येथे महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंबा, वड, चिंच, पिंपळ अशा 21 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच महाविद्यालयात औषधी वनस्पती वितरणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब शेलार, घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. योगेश शेलार, श्री. हर्षलशेठ आरशेलू उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनामध्ये असलेले महत्त्व सांगून पर्यावरण संगोपन आणि संवर्धन कशा पद्धतीने करता येईल याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यानंतर सर्व उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यानंतर सर्व उपस्थितांना औषधी वनस्पतीचे प्रमुख पाहुण्यांच्या आणि प्राचार्याच्या हस्ते वितरण करण्यात आले.प्रमुख पाहुणे श्री. रघुवीर शेलार यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण कायम तत्पर असले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी सतत काम करत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले तर आभार प्रा. शुभांगी पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, खजिनदार डाॕ. रोहिणी पाटील, प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, डॉ. मीनल भोसले, डॉ. खालीद शेख, प्रा. अर्चना सुतार, प्रा. सतीश ठाकर, प्रा. रोहित वरडकर, प्रा. आकाश शिर्के, डॉ. वर्षा निंबाळकर प्रा. अभिषेक पोखरकर ,श्री. राजेश भगत, उपकुलसचिव श्रीमती मनीषा पवार मॅडम, श्री निलेश शिंदे या व इतर सर्व प्राध्यापकांनी आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.