फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडीचा उत्साह
कोल्हापूर (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क): पन्हाळा तालुक्यातील कळे येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळून एका भव्य दिंडीचे आयोजन केले होते.
शाळेपासून धर्मराज मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये लहानग्या चिमुकल्यांपासून ते ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या, ज्यामुळे दिंडीला एक अनोखे स्वरूप प्राप्त झाले होते.
या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन देसाई, संचालिका सौ. रुपाली देसाई, मुख्याध्यापिका सौ. मेघा देसाई, उपमुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील, श्री.शिवशंकर तांदळे सर, श्री. बुरान सर, श्री. पाटील सर, सौ. दीपलक्ष्मी पाटील, सौ. खाडे आणि इतर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक मूल्यांबद्दल जागृती निर्माण झाली.

