शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडेचा निसर्गराज शिंदे चमकला!
तळेगाव दाभाडे -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ मधील पाचवीचा विद्यार्थी कु. निसर्गराज शंकर शिंदे याने शिष्यवृत्त परीक्षेत घवघवीत यश संपादन करत थेट जिल्हा गुणवत्ता यादीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
निसर्गराजच्या या यशामागे त्याचे मार्गदर्शक श्री. लहू पिंपळे आणि सौ. ज्योती वाघमारे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय चांदे आणि प्रशासन अधिकारी श्रीमती शिल्पा रोडगे मॅडम यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.
निसर्गराजच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संपूर्ण नगरपरिषद शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्याचं कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

